
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०७ वा दिवस
दारिद्र्य आणि अज्ञान ह्यांच्या भोवऱ्यात सापडून जे दिवसेंदिवस अधिकाधिक बुडत आहेत अशा आपल्या कोट्यवधी देशबांधवांचे कल्याण व्हावे अशी तळमळ असणारे व त्यासाठी यावच्छक्य प्रयत्न करणारे मोठ्या मनाचे शेकडो स्त्रीपुरुष जेव्हा जीवनातील सुखविलास उपभोगण्याच्या साऱ्या इच्छा टाकून देऊन कार्यरत होतील तेव्हाच भारतात जागृती घडून येईल माझ्या यःकश्चित् जीवनातही मला असा अनुभव आला आहे की, सद्हेतू निष्कपटता आणि असीम प्रेम ह्यांच्या योगाने जगाला जिंकता येते. हे गुण अंगी असलेली एकटी व्यक्ती लक्षावधी ढोंग्यांच्या आणि नरपशुंच्या दुष्ट योजना धुळीस मिळविण्यास समर्थ असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ११ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५
★ १८५५ कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्मदिन
★ १९०५ मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्मदिन
★ १९८४ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन.
★ जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन.
★ आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन.
