
मनमाड( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल मनमाड शाळेतआज गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गीता ग्रंथाचे पूजन करून करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहेर शुभहस्ते गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गीतारहस्य या वरती अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या संवादातील छोटेसे चित्रफीत दाखविण्यात आली मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना गीता जयंती का साजरे केली जाते गीता ग्रंथाचे 18 अध्याय व 700 श्लोक, भगवद्गीतेची आजच्या काळातील गरज याबाबत थोडक्यात माहिती दिली

त्याचबरोबर शाळेच्या सेविका सविता नवले यांनी शिक्षकांच्या सहमतीने गीतेची काही श्लोक सादर केले
. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
