सिन्नर (प्रतिनिधी ) सिन्नर मधील ज्येष्ठ दिव्यांग प्रकाश शंकर भाटजीरे
1971 मध्ये मॅट्रिक पास झाल्यावर 1972 पासून कॉलेज शिक्षणाबरोबरच त्यांनी अपंग चळवळ सुरू केली त्यानिमित्त त्यांचे हिमतीचा अपंग चळवळीचा व सामाजिक कार्याचा धावता आढावा सादर करीत आहोत

डिसेंबर 1967 शिवनेरी किल्ला सहल
सन 1967 मध्ये इयत्ता सातवी मध्ये असताना पुणे परिसरातील सहलीमध्ये शिवनेरी सर केले त्यानंतरही अपंगा वर मात करीत सिन्नर ढगा डोंगर सप्तशृंगी गड रायगड नी जेजुरीचा नवागड सर केले. मॅट्रिक पास झाल्यावर कॉलेजच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री फंडातून तीन चाकी सायकल मिळाली सन 1972 मध्ये अपंग शिष्यवृत्तीची मंजुरी मिळविताना समाज कल्याण पुणे यांचे कडून अपंगांना उपलब्ध सवलतीचे मार्गदर्शन घेऊन समाजातील तळागाळातील अपंगांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू केले अपंग शिष्यवृत्ती नी वैद्यकीय गरजांची पूर्ती या अनु षंगाने सुरू केलेले काम 1981 पर्यंत अपंग पुनर्वसनापर्यंत पोहोचले त्यासाठी सिन्नर तालुक्यातील अपंग बांधवांची संपर्क मोहीम राबविली
सन 1976 मध्ये वीज मंडळात स्थानिक नोकरी लाभल्याने या कार्यास अधिक वेग दिला सन 1980 पासून कामगार क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन वर्कर्स फेडरेशन या कामगार संघटनेमार्फत कामगार पतसंस्थेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली सन 1987 ते 1990 एक वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून काम केले. सण 1981 या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षात बेळगाव येथे आयोजित पोहण्याचे स्पर्धेत सहभाग घेतला याच वर्षी नोकरी करून एम कॉम चे शिक्षण पूर्ण केले तसेच लग्न करून संसारात पदार्पण केले.

मे 1985 नाशिक जिल्हा अपंग कल्याण व पुनर्वसन सहकारी संस्था नाशिकचे व्हाईस चेअरमन या नात्याने अपंगांच्या समस्या मांडताना तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय दिनकरराव पाटील यांचे समोर
सन १९८४ मध्ये नाशिक जिल्हा अपंग कल्याण व पुनर्वसन सहकारी संस्थेची स्थापना करून सन 1991 पर्यंत व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिले. गरजू अपंग सभासदांना रोजगार निर्मितीसाठी संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले सन 1985 आंतरराष्ट्रीय युवक वर्ष महाराष्ट्र राज्य रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने अपंग युवकांसाठी मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेसाठी प्रकाश भाटजीरे यांनी अपंग बांधवांची तयारी करून सहभाग नोंदवला व नागपूर येथे नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व केले सदरचे स्पर्धेत 11 पदके व एक शिल्ड अशी कमाई केली या कार्यासाठी सिने अभिनेते व तत्कालीन खासदार सुनील दत्त यांचे हस्ते सत्कार झाला

एक फेब्रुवारी 1986 तत्कालीन खासदार अभिनेते माननीय सुनील दत्त यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना
सन 2000 मध्ये सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत विजय संपादन करून संस्थेचे उपाध्यक्ष सेक्रेटरी व खजिनदार या पदांवर कामकाज करून संस्थेच्या शैक्षणिक विकास कार्यात हातभार लावला सन 2007 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर मुलांचे मदतीने शेती विकसित केली सेवानिवृत्तीच्या पैशातून घर विकसित करून तीनही मुलांची सोय केली आज बोनस आयुष्य जगत आहेत काही शारीरिक व्याधी काही संघर्षमय मानसिक त्रास असला तरी दिव्यांग सेवा चळवळ चालूच आहे
सन 1972 पासून सुरू केलेल्या त्यांच्या दिव्यांग चळवळीने वीस ते बावीस मध्ये पन्नास वर्षे पूर्ण केली असल्याने चळवळीचा सुवर्ण महोत्सव साजरा केला
शब्दांकन महामित्र दत्ता वायचळे
