
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे आज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण आरोग्य रुग्णालय, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी एच आय व्ही एड्स आजारा संदर्भात जनजागृती होण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना एड्स जनजागृती संदर्भात शपथ देण्यात आली.

एड्स जनजागृती सप्ताहातंर्गत महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे,उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड,नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्री. जाधव, श्री.गरुड, श्री.निकम व श्रीमती आढे उपस्थित होते

.सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना जागतिक एड्स दिन साजरा करण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. के. पवार यांनी केले

तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी. एम. अहिरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
