
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य “डॉ. दिलीप शिंदे” यांनी राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्यांना “सी. पी. एच. आर. सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे” यांच्या वतीने आयोजित “National Leadership Summit 2025” मध्ये प्रतिष्ठित “Excellency In Academic Administration Award” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या भव्य सोहळ्यात देण्यात आला. यंदाच्या परिषदेसाठी प्रभावी “Beyond Skills – Build What AI Can’t: Purpose, Leadership, and Legacy” अशी थीम निवडण्यात आली होती, जी आधुनिक शिक्षणातील मूल्याधारित नेतृत्वाचे महत्व अधोरेखित करणारी ठरली. या गौरवशाली सोहळ्यासाठी शिक्षणक्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते,

ज्यामध्ये: President म्हणून प्रो. डॉ. प्रकाश दिवाकरण (Director – Himalaya University व CEO – Infinite Global Research Conference Pvt. Ltd.) “Chief Guest” मिस्टर नीरज शर्मा (Vice Chairman – The Lexicon Group & Director – Pune Times Mirror, Civic Mirror and Multifit) Guest of Honour श्री. सागर खैरनार (HR Business Partner – Lotte India Corporation Limited, Havmor) Special Guest श्री. जिग्नेश फुरिया (Owner & Managing Director – Nirali Prakashan) यांचा समावेश होता. या समारंभात देशभरातील निवडलेल्या एकूण २६ शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासकीय व्यक्तींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराने त्यांच्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली ती म्हणजे उत्कृष्ट “Institutional Administration, Governance”, Outcome Based Education & Academic Planning मधील नवकल्पना, डिजिटल शिक्षण, संशोधन, कौशल्य आणि इनोव्हेशनवर आधारित उपक्रम, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संलग्नता व MoU भागीदारी दिसली. डॉ. शिंदे यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाने: विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती विकसित केली, स्टार्टअप, उद्योजकता आणि संशोधन संस्कृती बळकट केली, रोजगारोन्मुख अभ्यासक्रमांचे पुनर्रचना केली आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती अंगीकारली.
प्राचार्य दिलीप शिंदे यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी विशेष अभिनंदन करत डॉ. शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, ट्रस्टी प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, सीईओ डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालय विकास समिती प्रमुख डॉ. संतोष तांबे, उपप्राचार्य डॉ. गणेश तेलतुंबडे सर्व प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्कार स्वीकारताना डॉ. शिंदे म्हणाले: “शिक्षण केवळ कौशल्य विकसित करण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, नेतृत्व, नैतिकता आणि मानवी मूल्ये निर्माण करणे हेच खरे शिक्षण होय.”
