नाशिकरोड:- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या उपक्रमात शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत सर्वांनी यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. नशामुक्ती शपथवाचन इयत्ता नववीची विद्यार्थिनी श्रद्धा आडके हिने केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.