
नांदगाव (प्रतिनिधी)— मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात गीता जयंती निमित्ताने भगवान श्रीकृष्ण व भगवद्गगीतेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी गीता जयंती चे महत्त्व सांगताना गीता जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरी केली जाते. याच एकादशीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात.

गीता जयंती साजरी करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शोकाकुल आणि विचलित झालेल्या अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता उपदेश केला होता. आजचा हा दिवस भगवद्गगीतेचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान (कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन), जे कर्म करत राहण्याचे आणि फळाची अपेक्षा न ठेवण्याचे महत्त्व सांगते, ते आजही तितकेच महत्त्वाचे आहे.

याप्रसंगी अशोक मार्कंड, दत्तात्रय भिलोरे,बाळासाहेब कवडे ,रवी कवडे ,विजय देशमुख, शरद आहेर, सचिन थेटे,प्रसाद कवडे,कपिल पवार ,गणेश ढोणे, सुनिता निकम ,लता आहेर, मंगिता परदेशी ,अश्विनी खोकले, सुनंदा जाधव , सविता बोरसे, वेदिका घोळके,वैशाली पाटील उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
