
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०६ वा दिवस
गीतेच्या अध्ययनापेक्षा मैदानावर फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट पोहोचू शकाल. तुमचे स्नायू व मांसपेशी ही अमळ बळकट झाली म्हणजे तुम्हाला गीता व त्यातील तत्वे अधिक चांगले उमगतील. नवयुवकांनी आधी शक्तिसंपन्न बनले पाहिजे, त्यानंतर त्यांना आपोआप धर्माची तत्वे कळतील. तेव्हाच भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक आकलन होईल. तेव्हाच तुम्ही उपनिषदांचे मर्म, आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने अकाळू शकाल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १० अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १ डिसेंबर २०२५
★ मोक्षदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ गीता जयंती
★ १८८६ भारताचे सर्वेक्षण करणारे ब्रिटिश अधिकारी सर जार्ज एव्हरेस्ट यांचा स्मृतीदिन.
★ १९९० भारताच्या प्रथम महिला कॅबिनेट मंत्री, मुसध्दी राजकारणी, राजदूत, १९५३ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पंतप्रधान पंडित नेहरुंची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांचा स्मृतिदिन
★ १९६५ सीमा सुरक्षा दल स्थापना दिन.
★ १९८१ एड्स विषाणूचा शोध –
★ जागतिक एड्स प्रतिबंधक दिन.
★ गीता से क्या नाता है I गीता हमारी माता है I
