
पिंपरखेड ( प्रतिनिधी )कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी आज रोजी विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी होते. अध्यक्षांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी तनिष्का गरूड, पायल भवर, अपेक्षा सोर, सुवर्णा सोनवणे, पुष्कर इंगळे आदींनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मा. संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे यांनी त्यांच्या जीवनकार्याचा आपल्या भाषणातून आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. काशिनाथ गवळी यांनी स्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाची अनेक उदाहरणे देऊन त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मा. संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे, मा. कैलास पठाडे,मा. लक्ष्मण जाधव, मा. संदीपभाऊ मवाळ, श्रीमती अमिता पारखे, आबासाहेब सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. कलाशिक्षक लक्ष्मण जाधव यांचे फलकलेखन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मा. संजय कांदळकर यांनी मानले.
