
पिंपरखेड..(प्रतिनिधी) आज रोजी विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ८वी ९वीच्या जवळपास ४७ विद्यार्थीनींचे सिकलसेल सह सीबीसी, एचबी, मलेरिया आदी घातक रोगांबाबत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढवला. प्रा. आरोग्य केंद्र पिंपरखेड चे आरोग्य अधिकारी श्री काळे, तसेच आरोग्य सेविका, आशाताई आदींनी या कामी श्री काळे यांना सहकार्य केले. प्रा. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विद्यालयात दरवर्षी अशाप्रकारच्या तपासण्या केल्या जातात व रिपोर्ट्सवर आधारित उपचारही दिले जातात. लवकरच सर्व मुलींचे रिपोर्टस प्राप्त होतील व आवश्यकता असलेल्यांना उपचार दिले जातील असे श्री काळे म्हणाल
