
३० नोव्हेंबर २०२५ दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की शासकीय ओघोगिक वसाहतीचे जनक सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र विकासाचे शिल्पकार असलेल्या माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी १९८५ ते १९९९ या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. युती शासनाच्या काळात त्यांनी साडेतीन वर्षे ऊर्जा आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या दिघोळे यांचे सिन्नरच्या विकासात मोठे योगदान आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर शहरासाठी पाणीयोजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा उचलला. कडवा धरणाचे पाणी पूर्व भागात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. अशा माजी राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार राजेंद्र सातपुते यांनी मानले
या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,प्रकाश माळी,मनोज माळी,राजेंद्र सातपुते निलेश बातपुरे, सागर वाळेकर,नितीन ठाकरे, विठोबा नागरे ,कृष्णा बरके,शरद शिरसाठ, सुनिल गोळेसर धनंजय परदेशी, अनिल सोनवणे गणपत काळे,सोमनाथ लोहारकर
