
मांडवड (प्रतिनिधी) नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील प्रभू रामचंद्रांच्या पुण्यस्पर्शाने स्थापित पुरातन हेमाड पंथी श्री.मंडपेश्वर महादेव मंदिर कलशारोहण सोहळा व जप अनुष्ठान सोहळा श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरिजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तीन दिवस हरी किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार महाराज यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली. तसेच गावातील नागरिकांनी अखंड ओम नमः शिवाय जप यज्ञ करून कलश पूजन पूजन केले

दिनांक ३० नोव्हेंबर रोजी महामंडलेश्वर परमानंदगिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान मंडपेश्वर यांच्या पालखी चे सवाद्य मिरवणूक आयोजन करण्यात आली. यात मांडवड सह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत हर हर महादेव, ओम नमः शिवाय जय घोषणा भाविक देत होते.
तसेच मुख्य कलश व एकून ३५ कलशाचे पूजन करून स्वामींच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले.या नंतर स्वामींच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
