
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०५ वा दिवस
प्रथम एखादे वाद्य शिकायचे झाले तर त्याच्या तारा सावकाश छेडाव्या लागतात. असे करता करता बोटांना हळूहळू सवय होते. मग प्रत्येक तारेच्या कंपनाकडे लक्ष न देता आपण सफाईने वाद्य वाजवू लागतो. तसेच आजची आपली सहज कर्मे ही आपण पूर्वी जाणीवपूर्वक केलेल्या कर्माचा परिपाक असतात. सतत कार्यमग्न रहा. तुम्ही निःस्वार्थ अंतकरणाने अविरत कार्य करीत रहा, कार्य छोटे असो की मोठे एका विशिष्ट उंचीवर ते कार्य गेल्यावर, त्या कार्याची दखल जग घेतल्याशिवाय राहत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५
★ १८५८ नोबेल पारितोषिक विजेते महान भारतीय शास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचा जन्मदिन.
★ १९१० गोमंतकीय मराठी कवी बा. भ. ऊर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्मदिन.
