
नाशिक (प्रतिनिधी ) प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ श्रीमती अर्पिता ठुबे यांच्या संपन्न झाला. या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती अर्पिता ठुबे (भाप्रसे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्या संघ भावनेने आपण या क्रीडा स्पर्धा मध्ये आपला सहभाग नोंदवला व यश संपादन केले त्याच प्रकारे विभागीय स्पर्धेमध्ये देखील आपल्या प्रकल्पाचे नाव कसे उंचावेल व सर्वसाधारण जेते पद आपल्या प्रकल्पाला कसे प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धांसाठी नाशिक प्रकल्पातील धामणगाव, ठाणापाडा, करंजी व निरगुडे या चार केंद्रादरम्यान 14, 17 व 19 वर्षे या तीन वयोगटात सांघिक कबड्डी, खो-खो, हँडबॉल, हॉलीबॉल तसेच वैयक्तिक धावणे ,फेकी, उंच उडी, लांब उडी या क्रीडा प्रकारात खेळवल्या गेल्या. या क्रीडा स्पर्धांसाठी नाशिक प्रकल्प अंतर्गत 39 शासकीय आश्रम शाळा व 40 अनुदानित आश्रम शाळातील एकूण 742 मुले व 738 मुली असे एकूण 1480 खेळाडू सहभागी झाले होते.
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मा.अपर आयुक्त सन्माननीय दिनकरजी पावरा साहेब तसेच नाशिक प्रकल्पाच्या सन्माननीय प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय सामना 17 वर्ष मुले खो-खो करंजी विरुद्ध निरगुडे या दोन संघा दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळवण्यात आला. प्रथम व द्वितीय दिवशी सर्व सांघिक क्रीडा प्रकारातील स्पर्धा संपन्न होऊन, त्यानंतर सर्व वैयक्तिक स्पर्धा या ठिकाणी आज सकाळी दहा वाजेपर्यंत पार पाडण्यात आल्या.
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांमधून नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी खो-खो चे 90, कबड्डीचे 72, हँडबॉल चे 96, व्हॉलीबॉल चे 72, रिलेचे 50 तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारातील 128 असे एकूण ५०८ खेळाडूची निवड झालेली आहे.
सर्वसाधारण जेते पद ठाणापाडा केंद्राने पटकावले तर द्वितीय स्थान करंजी व तृतीय स्थान निरगुडे केंद्राने पटकावले.
क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी तमखाने , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री.तमखाने यांनी केले
