
ओझर दि.२८ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र यांनी केले. संविधान भारतीय लोकशाहीचा कणा असल्याचे शिक्षक विशाल पगारे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संविधान शपथ घेतली. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब रौदळ आत्माराम शिंदे उपस्थित होते. फलक रेखाटन कला शिक्षक मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी केले.

