
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०४ वा दिवस
आपण मनुष्य आहोत. देवाने आपल्याला विचारशक्ती दिली आहे. ती यासाठी की आपण तिचा योग्य प्रकारे वापर करावा, यासाठी नाही की पशूंना कुणीही हाकून घेऊन जावे त्याप्रमाणे आपण देखील कोणीही येऊन काहीही ठासून सांगितले की त्याच्यामागे निमुटपणे चालू लागावे यास्तव मला असे वाटते की आपण आपल्या भूत आणि वर्तमान काळाविषयी सर्व तथ्य सारी माहिती गोळा केली पाहिजे आपला दैदिप्त्यमान इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्यावर नीट विचार केला पाहिजे व त्याच्या आधारे भविष्याची योजना आखली पाहिजे. आपण निव्वळ भावनेच्या आहारी जाऊ नये.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ८ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५
★ १९५९ महाराष्ट्राचे सुप्रसिध्द इतिहासकार ‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा स्मृतिदिन.
★ १९९३ भारतीय नागरी विमान वाहतूकीचे जनक, वैमानिक, उद्योगपती, भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाॅय तथा जे. आर. डी. टाटा यांचा स्मृतिदिन.
