
सिन्नर ( प्रतिनिधी )२८ नोव्हेंबर २०२५ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३५ व्या स्मृती दिनानिमीत्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की,महात्मा फुले हे विचारवंत समाजसुधारक होते

उच्चवर्णीयांकडून होणा-या अन्यायापासुन,अत्याचारापासुन व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.छञपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली.जनतेने त्यांना महात्मा हि उपाधी बहाल केली.त्यामुळे जनता त्यांना महात्मा फुले म्हणु लागले.
विद्येविना मती गेली l
मतीविना नीती गेली l
नीतीविना गती गेली l
गतीविना वित्त गेले l
वित्ताविना शूद्र खचले l
इतके अनर्थ एका अविद्येने केले l l
शिक्षण न घेतल्यामुळे काय होते ते वरील ओळींतून महात्मा फुले यांनी सांगितले आहे.म्हणून शिका विद्येने मस्तक सुधारते सुधारलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही.असा संदेश महात्मा फुले यांनी दिला अशा महान क्रांतिसुर्यास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन किरण मुठे,प्रास्थाविक विजय मुठे तर आभार अशोक वरंदळ यांनी मानले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे ,राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे ,,बाळासाहेब मुठे अशोक वरंदळ, रमेश गोंदके आकाश धोंगडे, गोरख मुठे,नागेश गोसावी, मनोज दुमाने,किरण मुठे,सुनिल गुरुकुले आदि. उपस्थीत होते.
