
उजनी (ता. सिन्नर) येथे संविधान दिन उत्साहात साजरा
उजनी तालुका सिन्नर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान प्रतिमेची मिरवणूक काढून “प्रत्येक गावात संविधान पोहोचले पाहिजे” या उद्देशाने तब्बल १०० संविधान पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्षा शितलताई सांगळे, भारत कोकाटे, राजेश गडाख, महामित्र दत्तात्रय वायचळे, भाऊदास सिरसाट, दीपक पगारे, आनंदा कांदळकर सर, शिवाजी बर्गे सर, बाळासाहेब काळे किरण जगताप, मल्हारी साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी भारत कोकाटे व आनंदा कांदळकर सर यांनी संविधानाचे महत्व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले. महामित्र दत्तात्रय वायचळे यांनी संविधानाची गरज, मूल्ये आणि देशासाठी त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पूजनीय भिक्खू करुणानंद महाथेरो, संदीपजी मोरे, राजेंद्र मेहेरखांब सर, निवृत्ती सापनर सरपंच उजनी तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जगताप परिवार यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी ठरला.
