
वाशी (प्रतिनिधी ) वावी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात आज दि. २८नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक १० वाजता सत्यशोधक,
क्रांतीसूर्य, पुरोगामी विचारवंत, समस्त महिला व उपेक्षितांचे कैवारी, दलीतोद्धारक, कर्ते
सुधारक महात्मा ज्योतिबा फुले
यांची१३५वी पुण्यतिथी संपन्न झाली.
याप्रसंगी वाचनालयाचे नव निर्वाचित संचालक , शाहीर परसराम पतसंस्थेचे चेअरमन व
पतसंस्था फेडरेशन सिन्नर चे संचालक
श्री. इलाही
बक्ष शेख यांनी कार्यक्रमाचे
प्रास्ताविक केले. कृ. उ. बा.
सिन्नर चे माजी सभापती श्री.
विठ्ठलराव राजे भोसले यांनी म.
फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन प्रतिमा पूजन केले. या प्रसंगी नंदू शेठ मालपाणी, विकास
घेगडमल, माजी सरपंच अशोक ताजणे, संजय वेलजाळी, वावी सोसायटीचे माजी चेअरमन रामदास घेगडमल, निलेश वेलजाळी, विघ्नहर्ता प्रतिष्ठान चे
अध्यक्ष गणेश वेलजाळी, केशव ताजणे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे माजी चेअरमन दिलीप
वेलजाळी, शाहीर परसराम पतसंस्थेचे माजी चेअरमन बबन
ताजणे, वावी सोसायटीचे
माजी चेअरमन भाऊसाहेब वेलजाळी, किरण कांदळकर,नितीन घेगडमल, वाचनालय संचालिका सौ. कल्पलता वेलजाळी. यांचेसह
वाचक, सभासद, ग्रामस्थांची
उपस्थिती होती. अध्यक्ष श्री. कारभारी वेलजाळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
