
नाशिक-( प्रतिनिधी )२९ बातमीदार.. हृदयातून येणारं काव्य हे रसिकांच्या मनाचा ठाव घेते आपल्या प्रकृतीधर्माप्रमाणे लिहीलेले खरं काव्य आहे. मराठी कविता ही संत ज्ञानेश्वरांनी सुरु केली तर संत तुकारामांनी ती आपल्या पर्यंत पोहोचवली. वेगवेगळ्या कवींच्या कविता काळानुरुप बदलत गेल्या. तसेच कवींनी वेदना व्यथांसोबत जुन्या कवितांकडे पाहाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार आणि गेली अकरा वर्षे साहित्य संमेलनात कवी कट्ट्याचे संचालन करणारे राजन लाखे यांनी केले. ते नाशिक कवी या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी आर. के. सावे यांना नाशिक कवीच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘नाशिक काव्यगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि रोख रु. २१००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन सुभाष सबनीस यांनी केले. नाशिक कवीचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्याच्या प्रारंभी बाविसाव्या वर्धापनदिन दिनानिमित्त सुदाम सातभाई,अलका दराडे, माणिकराव गोडसे,प्रांजली आफळे, सुशिला संकलेचा, रंगनाथ डेंगळे, राजेंद्र तोडकर, भूपाल देशमुख, शिवाजी ठाकरे, शिवाजी साळुंखे,संगीता मुसळे, शालिनी सुर्वे,योगेश जाधव, मुकुंद गायधनी, अलका ठोठावले, तेजस्विनी कदम, निवांत गुरू, जयश्री कुलकर्णी, वैशाली सुर्यवंशी, रामचंद्र शिंदे,सुरेश चौरे, तुकाराम ढिकले आदी बावीस कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नाशिक कवीचे सर्व सदस्य आणि कवी आणि काव्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुत्रसंचलन भारती देव आणि किरण येणार यांनी केले यावेळी व्यासपीठावर असे बाळासाहेब सुभाष सबनीस, बाळासाहेब गिरी, नंदकिशोर ठोंबरे, स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, भारती देव हे उपस्थित होते
