
यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले
याप्रसंगी अध्याक्ष मनोगत व्यक्त करताना महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रासह देशभर महात्मा फुले यांनी “स्त्रीशूद्रातिशूद्र म्हणजेच उपेक्षित समाजाला” ज्ञानाचा मार्ग खुला करुन दिला. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथांच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग महात्मा फुले यांनी मांडला. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून महाराजांचा जातीपाती विरहित विचार गावोगावी नेला. महात्मा फुले यांनी सत्यावर विश्वास ठेवणारा समतामूलक समाज निर्माण करावा या उद्देशानं सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली. समाज व्यवस्थेतील दोषांवर केवळ बोट न ठेवता कृतीशील पर्याय देखील देण्याचं काम त्यांनी केले.
यावेळी अभिवादन करणासाठी महामित्र दत्ता वायचळे,भाऊसाहेब शिलावट, सचिन आहेर रामनाथ बलक, राजेंद्र भगत, दिगंबर पगर,प्रकाश मुठे,संजय माळी,राजेंद्र लोंढे डाॅ.संदिप लोंढे कैलास झगडे,विजय झगडे,डाॅ.जी.एल.पवार, डाॅ.विष्णू अत्रे, जयवंत लोंढे, दिगंबर वरंदळ, राजेंद्र मुठे,शिवाजी सातभाई, नाना माळी,अजय लोंढे, विकास मिठे,बळीराम देशमुख, रमेश कानडे,जितेंद्र साबळे, ज्ञानेश्वर माळी, शंकरराव माळी अरुण घोडेराव, खेतन मुठे आदि.उपस्थित होतै
