
साकोरा ( प्रतिनिधी ) पेडकाई माता सा .शै.संस्थेचे माध्यमिक विदयालय साकोरे येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी यांनी फुले यांच्या कार्याबद्ल छान अशे विचार मांडले यावेळी स्त्री शिक्षणा साठी महात्मा फुले यांनी केलेले महान कार्य दुसर्या कोणी एवढे केल्याचे दिसून येत नाही असे विद्यालयाच्या स्त्री शिक्षिका पुनम बोरसे, हेमलता पवार, शितल रंधे यांनी आपल्या भाषणामध्ये भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी फुले यांचे कार्य समाजातील सर्व जाती धर्मा साठी होते त्यात स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला तसेच शेतकरी मजूर कष्ट करी यांच्या साठी इंग्रजा बरोबर लढा दिला असे अनेक विचार आपल्या मनोगतातून मांडले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरसे एस जी यांनी केले. आभार मानवी बोरसे हिने केले.
