
जागर जाणिवांचा सण नवरात्रीचा अंतर्गत आज आपण जाणून घेऊया मुळच्या गढवाल येथील व सध्या पिंपरी चिंचवड येथे रहिवासी आशा नेगी हीरेमठ यांच्याबद्दल. आयुष्यात आलेल्या नकारात्मक गोष्टींचं सेलिब्रेशन – कॅन्सरपासून ‘ब्युटी ऑफ लाईफ’ पुस्तकापर्यंतचा त्यांचा प्रवासआयुष्यात प्रत्येकाला संघर्ष येतो. काही संकटं तर इतकी कठीण असतात की त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं. पण त्या अंधारातही एक छोटा दिवा असतो – जो आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो. 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यातही अचानक एन्ट्री झाली कॅन्सरची. ती वेळ त्यांच्यासाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक अशा तिन्ही स्तरांवर कठीण होती. सुरुवातीला भीतीने मन ग्रासलं होतं. त्यांना हरवल्यासारखं वाटायचं. पण हळूहळू जाणवलं – परिस्थिती कोणतीही असो, तिच्याशी लढण्याची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर संकटांवर मात करणं शक्य आहे. आणि त्यातूनच जन्म झाला – ‘ब्युटी ऑफ लाईफ’ या पुस्तकाचा!हे पुस्तक लिहिताना त्यांच्या मनात एकच ध्यास होता – जे त्यांनी अनुभवलं, ते अनेक लोकांपर्यंत पोहोचावं. जे लोक भीतीने थरथरतात, त्यांना आशेचा हात द्यावा. त्या स्वतःही त्या अंधारातून बाहेर आल्या आणि त्यांना मिळालेली ऊर्जा इतरांसोबत शेअर करावी अशी त्यांची प्रखर इच्छा झाली.या प्रवासाने त्यांना जे काही दिलं आहे ते शब्दात मांडणं अवघड आहे त्यांच्या पुस्तकाला एका वर्षात 20 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. एका वर्षात पुस्तकाची तिसरी आवृत्ती आली असंख्य लोकांनी कॅन्सरविषयीची भीती दूर करून उपचाराकडे सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलाअनेक महिलांनी त्यांच्या कामात सहभागी होण्याची तयारी दर्शवलीआणि सर्वात महत्त्वाचं – 3500 कॅन्सर पेशंटच्या मनात आत्मविश्वासाचा दीप पेटला. त्यांच्या अनुभवावर आधारित हा प्रवास त्यांना शिकवून गेला की, नकारात्मक गोष्टींना टाळून चालत नाही. त्यांना स्वीकारून, त्यातून शिकून त्याचं रूपांतर सकारात्मकतेत करावं लागतं. भीतीवर विजय मिळवणं हे कोणत्याही लढाईचं खरं बलस्थान असतं.आज जेव्हा त्या मागे वळून पाहतात , तेव्हा जाणवतं – कॅन्सर हे त्यांच्या साठी संकट नव्हते, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यातून निर्माण झालेलं पुस्तक, लोकांना मिळालेला आधार आणि मिळालेली मान्यता – हे सगळं त्यांच्या जीवनाचं सर्वात मोठं सेलिब्रेशन आहे.2023 मध्ये त्यांना थर्ड स्टेजचा ॲग्रेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सर झाला. शहरात राहून, सर्व गोष्टींची माहिती असूनही त्यांची ट्रीटमेंट चुकली. त्या काळात जे अनुभव आले त्यातूनच त्यांनी ठरवलं की आता कॅन्सर रुग्णांसाठी काम करायचं. आम्ही वेगवेगळ्या शाळा, कॉलेज आणि गावांमध्ये कॅन्सर विषयी जागृती निर्माण करण्यासाठी सतत काम करत आहोत. त्या म्हणतात भीतीच्या सावटातून आत्मविश्वासाच्या उजेडाकडे नेणं, अंधारावर विजय म्हणजेच खरा उत्सव आहे..खरी शक्ती म्हणजे आपल्यातलं धैर्य, सहनशक्ती आणि सकारात्मकतेची ऊर्जा आहे.. जर तुमच्यात असतील तर तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकता.. आयुष्यात आपल्यासमोर काय मांडून ठेवल आहे किंवा पुढे काय होईल याची कुणालाच कल्पना नसते किंवा त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो.. प्रत्येक अडचणींना धैर्याने सामोरे जाणे तर आपल्या हातात आहे.. “ब्युटी ऑफ लाइफ” या पुस्तकाचं प्रयोजनच आहे प्रत्येकाच्या मनातून कॅन्सर या शब्दाची भीती घालवणे… धैर्य, प्रेम आणि सकारात्मकतेने प्रत्येक अडचण पार करूया…कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल नव्हे तर आयुष्याची नवी सुरुवात आहे…आणि हे अगदी खरं आहे. We are the fighter’s. आज हम आशा नेगी हीरेमठ के बारे में जानेंगे, जो मूल रूप से गढ़वाल की रहने वाली हैं और वर्तमान में पिंपरी चिंचवाड़ में रहती हैं।जीवन में आई नकारात्मक घटनाओं का उत्सव – कैंसर से लेकर ‘जीवन की सुंदरता’ पुस्तक तक का उनका सफ़रजीवन में हर किसी को संघर्षों का सामना करना पड़ता है। कुछ संकट इतने कठिन होते हैं कि उनसे बाहर निकलना असंभव सा लगता है। लेकिन उस अंधेरे में भी एक छोटी सी रोशनी होती है – जो हमें आगे बढ़ने की ताकत देती है। 2023 में अचानक कैंसर ने उनके जीवन में प्रवेश किया।वह समय उनके लिए मानसिक, शारीरिक और भावनात्मक, तीनों स्तरों पर कठिन था। शुरुआत में, उनका मन भय से ग्रस्त था। उन्हें ऐसा लग रहा था जैसे वे खो गई हैं। लेकिन धीरे-धीरे उन्हें एहसास हुआ – परिस्थिति कैसी भी हो, अगर आपके पास उससे लड़ने की तत्परता और सकारात्मक दृष्टिकोण है, तो संकटों पर विजय पाना संभव है। और इसी से जन्म हुआ – ‘ब्युटी ऑफ लाइफ ‘ पुस्तक! इस पुस्तक को लिखते समय, उनकी एक ही महत्वाकांक्षा थी – अपने अनुभवों को अधिक से अधिक लोगों तक पहुँचाना। जो लोग भय से काँपते हैं, उन्हें आशा का हाथ दिया जाना चाहिए। वह खुद उस अंधेरे से बाहर आईं और उन्हें जो ऊर्जा मिली, उसे दूसरों के साथ साझा करने की तीव्र इच्छा हुई।इस यात्रा ने उन्हें जो दिया है, उसे शब्दों में बयां करना मुश्किल है। उनकी किताब ने एक साल में 20 राज्य-स्तरीय पुरस्कार जीते। किताब का तीसरा संस्करण एक साल में ही प्रकाशित हुआ।अनगिनत लोगों ने कैंसर के अपने डर पर काबू पाया है और इलाज के प्रति सकारात्मक दृष्टिकोण अपनाया है।कई महिलाओं ने उनके काम में भाग लेने की इच्छा दिखाई है और सबसे महत्वपूर्ण बात – 3500 कैंसर रोगियों के दिलों में आत्मविश्वास का दीप जला है।अपने अनुभव के आधार पर, इस यात्रा ने उन्हें सिखाया है कि नकारात्मक चीजों से बचना कारगर नहीं होता। उन्हें इसे स्वीकार करना होगा, इससे सीखना होगा और इसे सकारात्मकता में बदलना होगा। डर पर काबू पाना ही किसी भी लड़ाई की असली ताकत है। आज जब वह पीछे मुड़कर देखती हैं, तो उन्हें एहसास होता है – कैंसर उनके लिए कोई संकट नहीं था, बल्कि उनके जीवन का एक महत्वपूर्ण मोड़ था। इससे निकली किताब, लोगों से मिला समर्थन और पहचान – यह सब उनके जीवन का सबसे बड़ा उत्सव है।2023 में, उन्हें गंभीर तीसरे चरण के स्तन कैंसर का पता चला। शहर में रहते हुए, सब कुछ जानते हुए भी, वह अपने इलाज से चूक गईं। उस दौरान मिले अनुभवों से ही उन्होंने कैंसर रोगियों के लिए काम करने का फैसला किया। हम विभिन्न स्कूलों, कॉलेजों और गाँवों में कैंसर के बारे में जागरूकता फैलाने के लिए लगातार काम कर रहे हैं। कहते हैं न डर के साये से आत्मविश्वास के उजाले की ओर बढ़ना, अंधकार पर विजय ही सच्चा उत्सव है। सच्ची ताकत हमारे भीतर साहस, सहनशक्ति और सकारात्मकता की ऊर्जा है। अगर ये आपके पास हैं, तो आप किसी भी संकट का सामना कर सकते हैं।ज़िंदगी हमारे लिए क्या लेकर आई है या आगे क्या होगा, इसका किसी को अंदाज़ा या नियंत्रण नहीं है। हर मुश्किल का हिम्मत से सामना करना हमारे हाथ में है।”ब्यूटी ऑफ़ लाइफ” पुस्तक का उद्देश्य सभी के मन से कैंसर शब्द के डर को दूर करना है… आइए, साहस, प्रेम और सकारात्मकता के साथ हर मुश्किल का सामना करें…कैंसर जीवन का अंत नहीं, बल्कि जीवन की एक नई शुरुआत है… और यह बिल्कुल सच है।
