
निफाड (प्रतिनिधी) वनाधिपती विनायक दादा पाटील विचार मंच, निफाड यांच्या वतीने स्वर्गीय विनायकदादा पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी व समाजभान जागं करणारी कवितांची मैफल निफाड येथे संपन्न झाली, या कार्यक्रमात कवितेच्या माध्यमातून समाजातील विदारक वास्तव, आत्महत्याग्रस्त शेतकरी, आणि बदलत्या सामाजिक मूल्यांवरील चिंतन व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात स्व. विनायक दादा पाटील यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली

.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आ.दिलीपराव बनकर, कृषी तज्ञ व साहित्यिक सचिन होळकर हे उपस्थित होते प्रास्ताविक वि.दा.व्यवहारे यांनी केले जेष्ठ कवी प्राचार्य लक्ष्मण महाडीक कवी प्रा. संदीप जगताप, विचारशील साहित्यिक विवेक उगलमुगले, आणि राजेंद्र सोमवंशी या मान्यवर कवींनी आपल्या काव्यरचनांद्वारे उपस्थितांचे मन भारावून टाकले.कवी संदीप जगताप व लक्ष्मण महाडीक यांनी सादर केलेल्या “शेतकरी आत्महत्या” या विषयावरील कवितांनी प्रेक्षकांना भावनिक केले. *“पिक दुष्काळात जळतं, पुरात वाहतं, अवकाळी सडतं, गारपिटीत झोडपतं… तुच सांग वर्षाकाठी वावरात काय शिल्लक राहतं..?*” या ओळींनी शेतकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.त्याचबरोबर, *“बँक्वेट हॉलमधील साखरपुडा, डिजेवरची मेहंदी, लाखोंचं प्रि-वेडिंग शूटिंग… रक्त शोषून उधळपट्टी करणारे लग्न या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे, कारण मला माझा बाप जिवंत हवा आहे*” या आशयाच्या कवितेला विशेष दाद मिळाली.कवी राजेंद्र सोमवंशी यांनी फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या तरुण डॉक्टर युवतीच्या दु:खद घटनेवर आधारित “अशीच पणती एखादी विझून जाते” या शीर्षकाची कविता सादर करताना प्रेक्षकांना अंतर्मुख केले. या कवितेतील “ कुठे चाललो आपण सारे, मनास प्रश्न विचारा ” या ओळींनी आत्मपरीक्षणाची हाक दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विवेक उगलमुगले यांनी करताना स्वर्गीय विनायकदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी “एक हात मदतीचा” या संकल्पनेचा उल्लेख करत, दादांच्या समाजकार्यातील प्रेरणादायी वाटचालीचा मागोवा घेतला.या प्रसंगी निफाड तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, न्यायमुर्ती रानडे विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त रतन पाटील वडघुले , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन राजाभाऊ राठी, भाजपा जिल्हाध्यक्ष यतीन कदम, तसेच अँड. शांताराम बनकर, दुध संघाचे माजी चेअरमन शिवाजी ढेपले. अंजलीताई उगावकर, भारतीताई कापसे, डॉ. सिमा डेर्ले, मालती वाघावकर, रमेशचंद्र घुगे, वैकुंठ पाटील, भाऊसाहेब भवर, अँ इंद्रभान रायते, माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, प्रमोद जडे, नगरसेवक सागर कुंदे, दिलीप कापसे, निफाड नागरी सह. बँकेचे चेअरमन अशोक पोफळिया, डॉ. उत्तमराव डेर्ले, अँड. रामनाथ शिंदे, लक्ष्मणराव निकम, बबनराव सानप, मधुकर राऊत, सुनील जाधव,संजय गाजरे,भास्कर पानगव्हाणे,गौरव पानगव्हाणे, रमेश जाधव, तनवीर राजे, सागर निकाळे, सुहास सुरळीकर, दत्तात्रय डुकरे यांच्यासह निफाड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाजीराजे ढेपले यांनी आभार मानले.
