
डोंगरमाथा (प्रतिनिधी ) मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “माझी शाळा,माझा अभिमान” या उपक्रमाअंतर्गत दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरमाथा येथील सेवालाल महाराज चौक येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्री.रतन मानसिंग चव्हाण,शालेय व्यवस्थापन समितीच्या महिला अध्यक्षा सौ.सविता दुलचंद राठोड, उपाअध्यक्ष श्री.अर्जुन ममराज चव्हाण,ग्रामस्थ,पालक,माजी विद्यार्थी,माजी शिक्षक श्री.संतोष राठोड सर उपस्थित होते. याप्रसंगी माझी विद्यार्थ्यांनी शाळेला थोर समाजसुधारक यांचे फोटो,शैक्षणिक साहित्य वही,पेन्सिल,अंकलिपी असे एकूण दहा हजार पाचशे रुपयांचे शैक्षणिक साहित्य शाळेला सप्रेम भेट दिले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात शाळेतील शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षा,इंजिनिअरिंग क्षेत्रातील सीईटी परीक्षा यांची तयारी करत असल्याने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येऊन त्यांचा शाळेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री कल्याणराव भिमराव पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.रामचंद्र पाटील सर यांनी केले.
