
निगडोळ:-रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णांच्या जयंती महोत्सव सप्ताहचे औचित्य साधून विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा शिक्षक ए.बी. वाघमारे यांनी क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले इ.८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कबड्डी,खो खो इ.सांघिक व गोळा फेक,थाळी फेक,उंच उडी,लांब उडी,शर्यती इ.वैयक्तिक,लिंबू चमचा, स्लो सायकलिंग इ.मनोरंजनात्मक खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळांचा आनंद घेतला.जेष्ठ शिक्षिका पी.व्ही.गायकवाड मॅडम व एन.जे. कापडणीस यांनी पंच म्हणून काम पाहिले.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी विजयी व सहभागी संघांचे व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए व भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.
