
सिन्नर ( प्रतिनिधी )२७ मे २०२६ त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६२ व्या स्मृतीदिनानिमित्त सिन्नर येथे महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाई आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
माता रमाई अवघ्या ९ व्या वर्षी भीमराव आंबेडकरांशी त्यांचा विवाह झाला.कठोर काळ: बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या काळात रमाबाईंनी अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि उपासमार सहन केली.अपत्ये: त्यांना ५ अपत्ये यशवंत, गंगाधर, बाळकृष्ण, इंदू आणि राजरत्न झाली, परंतु अत्यंतिक गरिबी व उपचाराअभावी त्यापैकी केवळ यशवंतराव हयात राहिले. दुर्दैवाने, इतर सर्व मुलांचा बालपणातच मृत्यू झाला. सामाजिक कार्यात योगदानबाबासाहेब जेव्हा देशातील वंचित, अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आंदोलने उदा. महाडचे चवदार तळे सत्याग्रह करत असत, तेव्हा त्यांच्या माघारी रमाई घरची सर्व जबाबदारी अत्यंत धैर्याने सांभाळत.कोणत्याही संकटात त्या डगमगल्या नाहीत

आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमधील आणि सत्याग्रहांमध्ये रमाबाईनी भाग घेतला डाँ.आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या बहुजना व दलित समाजातील लोक रमाबाई आई साहेब आणि डाँ. आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणून संबोधतात,माता रमाई ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या त्यामुळे बाबासाहेबांना आपले ध्येय पुर्ण करता आले.माता रमाई यांचा मृत्यू २७ मे १९३५ रोजी झाला.
अशा या महान त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…
तसेच
विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिल स्वातंत्र्य लढा महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले。 त्यांनी १९२९ मध्ये लाहोर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्याचा’ ठराव मांडला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे पहिले प्रधानमंत्री बनले त्यांनी १७ वर्षे १९४७ ते १९६४ या पदावर काम केले आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी धरणे, कारखाने, आणि आयआयटी (IIT) सारख्या महत्त्वाच्या शिक्षण संस्थांची उभारणी केली.अशा प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मोरे यांनी केले तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले व आभार सुनील गुरुकुले यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,संदिप मुठे सुनिल गुरुकुले भुषण मोरे लखन पाचोरे आकाश धोंगडे रोहित मुठे किरण मुठे आदि. उपस्थित होते.
