
मुंबई (प्रतिनिधी ) युवा कवी.मा.योगेश हरणेसमाज माध्यम गौरव पुरस्काराने सन्मानितवसुधा फाऊंडेशन पुणे आयोजित पहिली माध्यम परिषद तसेच पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष, परिषद अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, उद्घाटक मा प्रमोद सूर्यवंशी दिग्दर्शक,प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विशेष उपस्थिती आधुनिक बहिणाबाई मा.विमलताई माळी प्रसिद्ध कवयित्री तसेच वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक तसेच मा.वैभव नाईक या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते.यावेळी समाज माध्यम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.हा पुरस्कार साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,कलेच्या माध्यमातून व विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करत असलेल्या संस्थांना किंवा व्यक्तींना दिला जातो.वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक यांनी काव्ययोग काव्य संस्था पुणे मा.योगेश हरणे करत असलेल्या साहित्यिक, सामाजिक , शैक्षणिक कार्याची दखल घेतली तसेच त्यांना “समाज माध्यम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.असे २४ पुरस्कार सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सर्व पुरस्कार्थीना मानवस्त्र तसेच आकर्षक असे सन्मानचिन्ह देण्यात आले.
