
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८४ वा दिवस


देह ज्याप्रमाणे मानवाच्या हातचे एक यंत्र आहे, त्याचप्रमाणे मनही आत्म्याच्या हातचे एक यंत्र आहे. जड म्हणजे बाहेरील गती. मन म्हणजे आतली गती. सर्व परिवर्तने, सगळे बदल कालातच सुरू होतात आणि कालातच संपतात त्यांचा प्रारंभही कालात आणि समाप्तही कालात. आत्मा जर अपरिवर्तनशील वा बदलणारा असेल तर तो पूर्ण असलाच पाहिजे; तो जर पूर्ण असेल तर तो अनंत असलाच पाहिजे; आणि तो जर अनंत असेल तर तो फक्त एकच, एकमेवाद्वितीयच असला पाहिजे, कारण दोन अनंत अस्तित्वात असणे अशक्य शक्यच नाही, म्हणून आत्मा फक्त एकच असणे शक्य आहे. जर एखादा माणूस सूर्याकडे जायला निघेल तर पावलोगणती त्याला एकेक वेगवेगळा सूर्य दिसेल खरा, पण अखेर ते सगळे सूर्य म्हणजे तो एकच सूर्य आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ७ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २८ मे २०२६
★ बकरी ईद
★ १८८३ थोर क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यीक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव) यांचा जन्मदिन.
★ १९०३ किर्लोस्कर उद्योग समुहाचे प्रमुख मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
