
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ पाटिल यांजकडुन –
नाशिक जिल्हयातील सुप्रसिध्द ग्रामीण कथा लेखक, पत्रकार तथा कवी नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांचे उदया शुक्रवार दि.२९ मे रोजी धाराशीव शहरात आयोजीत साहित्य संमेलनात कथा कथन होणार आहे.
गायकर यांचे कथा कथनाचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातील कानाकोपर्यात पार पडलेले आहे. त्यांच्या कथानां अनेकानेक पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच विविध विषयावर भाष्य करणार्या कथानां दिवाळी अंक, वर्तमान पत्रात प्रसिद्धी मिळालेली आहे.
धाराशीव येथे उदया राज्याच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा ताई पवार यांचे हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिध्द दिग्दर्शक शरद गोरे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संध्या ६ वा कथा कथन सत्र होणार असुन नवनाथ पाटिल हे या सत्राचे अध्यक्ष स्थान भुषवणार आहेत.
यावेळी महाराष्ट्रातील नामवंत लेखक या सत्रात सहभागी होणार आहे.
