
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
एक ध्येय्य, एक विचार.आणि त्यासाठी समर्पित भावनेनं वाहुन घेतलेलं आयुष्य.न सत्तेचा, पदाचा, पैश्याचा कसलाही लोभ.असं समर्पित आयुष्य जगणारी थोर महान माणसे या पृथ्वीतलावर खुप कमी अवतरली.त्यातलं एक धगधगत नाव म्हंणजे विनायक दामोधर सावरकर.
आणि हे भारतरत्न पैदा झाले ते नाशिकची जन्म भुमी महापवित्र.
प्रखर बुद्धिमता असलेले सावरकर इंग्रजाच्या देशात जाऊन बँरिस्टर बनले होते.स्वार्थी विचार केला असता ते आयुष्यभर पैशाच्या ढिगार्यात लोळले असते.पण राष्ट्राप्रती असलेले असिम प्रेम व कळवळीपोटी त्यांनी संपुर्ण आयुष्य पणाला लावले.
शांतीच्या , अहिंसेच्या मार्गाने कुठलीही क्रांती होत नाही.त्यासाठी छत्रपतीचां मावळाच बनावे लागते ही शिकवण सावरकराचीं होती.
असंख्य आक्रमकानीं भारत मातेवर सांस्कृतीक, सामाजिक, मानसिक व शैक्षिक सगळयाच बाजुने आक्रमण करत इथली चोख व्यवस्था मोडुन तोडुन टाकली होती.हिंदु सनातन धर्म संपवण्यासाठी असंख्य मार्गाने छळ केला गेला.बळ वापरले गेले व कोटीची संख्या असुनही मुठभर परकियानीं हा देश , ही भुमी गुलाम केली होती.
सावरकरानीं या भुमित क्षात्रतेज जागवले. प्रसंगी हिंसेचा मार्ग चोखाळला व ब्रिटिश सरकारला नाकी नऊ आणले.
सुखाचा त्याग करुन सशस्र क्रांतीचा मार्ग पत्करलेल्या सावरकरानां काळया पाण्याची भयानक शिक्षा झाली.भाऊ बाबाराव या छळातच मरण पावले.घर कुटुंब उध्वस्त झाले पण सावरकर ना झुकले, ना वाकले, ना थकले.ब्रिटिश राजवटीचे कुशीत भारतातील इतर नेते गादी पलंगावर लोळत घोळत असतानां सावरकर मात्र पळत होते, छळले जात होते.
सावरकर जहाल होते, तसेच ते प्रखर हिंदुत्ववादीही होते. स्वातंत्र्यानंतरही नशिबी सुख नव्हे तर उपेक्षा व धरपकडच आली.
पण सावरकर ध्येय्यापासुन कणभरही विचलीत झाले नाही.ज्या राष्ट्रासाठी, हिंदुसाठी, येथल्या जनतेसाठी ते लढले त्यांनाही सावरकर कळायला अनेक वर्षे लागली.
आज सावरकरानीं जे विचार, जे बीज पेरले आहे, त्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत त्याची महत्ता आज कळायला लागली आहे. आज या बीजाचा वटवृक्ष झाला आहे.आज अमृततुल्य अशी फळे लागली आहे.
अशा या महान धुरंधर सपुतास कोटी कोटी प्रणाम!!
