
मायबाप’ कार्यक्रमात कविता सादर करताना कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे. निवेदक रवींद्र मालुंजकर.
मालेगाव:- ‘बाप सोडून जाताना/सुन्या झाल्या दाही दिशा झाला पोरका भूगोल/आणि फाटला नकाशा!’ कवी राजेंद्र उगले यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत पितृप्रेमाच्या आठवणींचा जागर उमराणे (ता.मालेगाव) येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये झाला. निमित्त होतं सेवानिवृत्त शिक्षक भास्करराव त्र्यंबकशेठ साईनकर (गुरुजी) यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत ‘मायबाप’च्या १९३व्या प्रयोगातून पित्याच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले. कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले. ‘नाही घातलीस माळ/नाही लावियेला टिळा माझ्या मायमाऊलीचा/भक्तिमार्ग साधाभोळा’ असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घराला मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या वडिलांचं मोठेपण मांडताना- ‘श्रीमंती मनाची| मूर्ती चंदनाची| कीर्ती मानवाची| बाप माझा||’ अशा भावना व्यक्त केल्या. निवेदनात रवींद्र मालुंजकर यांनी कवी कमलाकर देसले यांच्या ‘येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी, आठवतील तेवढ्या आठवणी काढ, बाप असतो उन्हामधलं, सावली देणारं वडाचं झाड…,’ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या ‘माय अंगुळ करिती, पाणी व्हात-व्हात जाई, थेट पंढरपुरात, त्याची चंद्रभागा होई…’ या कवितांसह विविध कविता सादर करत मातापित्यांच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमात सादर झालेल्या कवी प्रशांत केंदळे यांची ‘बापलेकीची कहाणी,’ प्रा.राजेश्वर शेळके यांची ‘बूट आणि टाय,’ विजयकुमार मिठे यांची ‘काय देऊ पोरी तुला,’ काशीनाथ वेलदोडे यांची ‘झाडाच्या पानापानात,’ गौरवकुमार आठवले यांची ‘लक्तरांची जिंदगी जोडीत गेला बाप माझा…’ अशा विविध कवितांच्या सादरीकरणातून आईवडिलांविषयी कृतज्ञभाव जागवल्यामुळे उपस्थित भावनाविवश झाले. कार्यक्रमाचे आयोजन केशवराव साईनकर, अरुण साईनकर, योगेश साईनकर, अलका बाविस्कर, ललिता बाविस्कर, वैशाली पोतदार, हेमलता साईनकर, मनीषा साईनकर, राकेश बाविस्कर, अभिषेक साईनकर आदींसह साईनकर परिवाराने केले.फोटोओळी:- ”मायबाप’ने जागवल्या पितृप्रेमाच्या आठवणी! मालेगाव:- ‘बाप सोडून जाताना/सुन्या झाल्या दाही दिशा झाला पोरका भूगोल/आणि फाटला नकाशा!’ कवी राजेंद्र उगले यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत पितृप्रेमाच्या आठवणींचा जागर उमराणे (ता.मालेगाव) येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये झाला. निमित्त होतं सेवानिवृत्त शिक्षक भास्करराव त्र्यंबकशेठ साईनकर (गुरुजी) यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत ‘मायबाप’च्या १९३व्या प्रयोगातून पित्याच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले. कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले. ‘नाही घातलीस माळ/नाही लावियेला टिळा माझ्या मायमाऊलीचा/भक्तिमार्ग साधाभोळा’ असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घराला मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या वडिलांचं मोठेपण मांडताना- ‘श्रीमंती मनाची| मूर्ती चंदनाची| कीर्ती मानवाची| बाप माझा||’ अशा भावना व्यक्त केल्या. निवेदनात रवींद्र मालुंजकर यांनी कवी कमलाकर देसले यांच्या ‘येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी, आठवतील तेवढ्या आठवणी काढ, बाप असतो उन्हामधलं, सावली देणारं वडाचं झाड…,’ लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या ‘माय अंगुळ करिती, पाणी व्हात-व्हात जाई, थेट पंढरपुरात, त्याची चंद्रभागा होई…’ या कवितांसह विविध कविता सादर करत मातापित्यांच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमात सादर झालेल्या कवी प्रशांत केंदळे यांची ‘बापलेकीची कहाणी,’ प्रा.राजेश्वर शेळके यांची ‘बूट आणि टाय,’ विजयकुमार मिठे यांची ‘काय देऊ पोरी तुला,’ काशीनाथ वेलदोडे यांची ‘झाडाच्या पानापानात,’ गौरवकुमार आठवले यांची ‘लक्तरांची जिंदगी जोडीत गेला बाप माझा…’ अशा विविध कवितांच्या सादरीकरणातून आईवडिलांविषयी कृतज्ञभाव जागवल्यामुळे उपस्थित भावनाविवश झाले. कार्यक्रमाचे आयोजन केशवराव साईनकर, अरुण साईनकर, योगेश साईनकर, अलका बाविस्कर, ललिता बाविस्कर, वैशाली पोतदार, हेमलता साईनकर, मनीषा साईनकर, राकेश बाविस्कर, अभिषेक साईनकर आदींसह साईनकर परिवाराने केले.
