
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३१ वा दिवस* आपल्याला जर काही विशिष्ट उद्दिष्टे गाठावयाची असतील तर काही विशिष्ट साधनांचा अवलंब करावा लागतो. स्थल, काल, पात्र इत्यादीनुसार साधने बदलतात हे खरे, परंतु साध्यामधे काहीच बदल घडून येत नाही. आत्म्याची मुक्ती साधणे व जगाचे कल्याण करणे हे संन्याशाचे ध्येय असते. ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च.’ हे ध्येय गाठण्याची जी साधने आहेत त्यांपैकी कामिनी कांचन त्याग हे साधन सर्वात महत्त्वाचे आहे. सर्व स्वार्थी हेतूंचा संपूर्ण अभाव म्हणजे त्याग होय हे लक्षात असू द्या. केवळ बाह्यतः संपर्क न ठेवणे म्हणजे त्याग नव्हे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५
★ इंदिरा एकादशी
★ एकादशी श्राद्ध
★ १८८५ समाजसुधारक, लेखक, पत्रकार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा जन्मदिन.
★ १९५१ समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्मदिन.
★ १९४८ मराठवाडा मुक्ती दिन.
★ राष्ट्रीय श्रम दिन.
