
नांदगाव :=आमदार सुहास कांदे साहेब यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी घरपोच सुविधा दिली जाते. या माध्यमातून आज गिरणानगर वडाळकर वस्ती येथील ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा महिलांना संमतीत योजनांचा लाभ मिळवून देणारे मंजुरी पत्रक वाटप करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळाल्याबाबत आमदार सुहास कांदे साहेब, यांचे आभार मानले.
मागील तीन वर्षांपासून मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा गावागावात घरपोच दिल्या जातात या माध्यमातून निराधार व विधवा महिलांना शासनाच्या योजनेसाठी सर्व रीतसर कागदपत्र जमा करत व शासकीय प्रक्रिया नंतर घरपोच आदेश पत्र वाटप केले जातात.
या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
