
वसंतनगर जातेगाव (ता. नांदगाव) येथील श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय, व्हि एन नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, पिनाकेश्वर वरिष्ठ महाविद्यालय तसेच संत सेवालाल महाराज विधी महाविद्यालय येथे आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस. जी. राठोड साहेब उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव श्री सिद्धांत दादा राठोड व संस्थेचे आधारस्तंभ श्री जितेंद्र राठोड साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
