
सिन्नर ( प्रतिनिधी).महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले ना प्रा.मा.म.देशमुख महाराष्ट्रातील बहुजन समाज वैचारिकदृष्ट्या जागृत झाले सत्य इतिहासची महाराष्ट्राच्या मनामनात पेरणी करणारे जहाल लेखक आणि थोर तज्ञ नवीन इतिहासाची मांडणी करणे, बहुजन जागृतीसाठी आपल्या लेखणीतून त्यांनी नवीन दालन उघडले. लेख भाषणे देऊन बहुजनांमध्ये जनजागरण केले.असे महामित्र दत्ता वायचळे म्हणाले.मध्ययुगिन भारताचा इतिहास या ग्रंथाचा माध्यमातून राजकीय, सामाजिक, संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. बहुजन समाज व चळवणीची मोठी हाणी झाली झाल्याने डि.डि.गोडे यांनी खंत व्यक्त केली. प्रा. मा. म. देशमुख हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक होते.त्यांनी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी अनेक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यांच्या संशोधन आणि लिखाणामुळे बहुजन इतिहास आणि संस्कृतीचे महत्त्व समाजात रुंदावले.प्रा. मा. म. देशमुख आणि बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्यात घनिष्ठ संबंध होते, ज्यामुळे बहुजन समाजाच्या हक्कांसाठी अनेक प्रयत्न झाले.असे प्रा.राजाराम मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेप्रा. मा. म. देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या इतिहास आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे स्तंभ हरपले आहे.असे विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेसहवेदना सभेचे सुत्रसंचलन विजय मुठे यांनी केले.अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे प्रास्ताविक धम्मानंद डोंगरदिवे यांनी केले तसेच डाॅ आर.टी.जाधव आभार मानले या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, डि.डि.गोडे, प्रा.राजाराम मुंगसे, डाॅ.आर.टी.जाधव, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, धम्मानंद डोंगरदिवे, प्रशिक डोंगरदिवे,रमेश लोंढे, विजय जाधव,पोपटराव जाधव, शिवाजी कानाडी,नामदेव कुटे,सोमनाथ लोहारकर, राजेंद्र देशमुख मनोज माळी,गोपीनाथ वाजे, रघुनाथ जाधव, अरुण जाधव, धनंजय परदेशी, राजेंद्र सातपुते पांडुरंग चकोर, गणपत काळे, निवृत्ती लोंढे, नवनाथ शेळके, विजय सुर्वे, दत्ता जाधव, प्रकाश माळी आदि.उपस्थित होते.
