
नांदगाव ( प्रतिनिधी )दिनांक 20 मार्च नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित, व्ही.जे.हायस्कूल, नांदगाव येथे हरित सेने अंतर्गत 20 मार्च जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे अधिकारी माननीय श्री संतोष शिंदे सर, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री लक्ष्मीकांत ठाकरे सर, उप मुख्याध्यापक माननीय श्री खालकर सर, शाळेचे हरित सेना प्रमुख श्री ए. पी. सोनवणे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री नवसारे सर हे उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रमुख अतिथी माननीय श्री शिंदे सरांनी पर्यावरण आणि माणूस यांचे अतूट नातेकसे विस्कळीत होत चालले आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. ह्या पर्यावरणातील पशू, पक्षी यांचे अनन्यसाधारण महत्त्व विषद करून त्यातील चिमणी हा पक्षी वाचविण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या पातळीवर विद्यार्थी छोटे छोटे काय प्रयत्न करू शकतात . यासंबंधी मार्गदर्शन केले. चिऊ ताईच्या गोष्टी ऐकत मोठी झालेली पिढी आता म्हातारी होत चाललेली आहे.

मोबाईल व टी.व्ही.वरील कार्टून्स बघणाऱ्या खेळणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांनी चिमणीसाठी दाणा-पाणी व घरट्याची व्यवस्था करावी व पक्षांवर प्रेम करून त्यांना माणसाचा लळा लावावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री लक्ष्मीकांत ठाकरे सरांनी केले.कार्यक्रमाचे फलक लेखन श्री विजय चव्हाण सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरित सेना विभागाचे श्री रवींद्र ठाकरे सर यांनी केले.
