
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित ,सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे थोर समाजसेवक “श्री संत सेवालाल महाराज” यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून , पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच श्री संत सेवालाल महाराज यांची आरती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्री .एस जी राठोड साहेब, सचिव सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराजांच्या जीवन कार्यावर भाषणे व गीते सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपशिक्षक श्री सांगळे सर यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त करून संतांच्या आदर्शाचा अंगीकार करून समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच संत सेवालाल महाराज यांनी समाजात एकता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची जोपासना केली याचा उल्लेख केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी श्री संत सेवालाल महाराजांच्या “संत सेवालाल महाराज की जय”घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली. अशाप्रकारे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
