
सिन्नर ( प्रतिनिधी ) १५फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त महामित्र परिवार , आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड सिन्नर च्या वतीने भगवान महादेव आणि संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात भगवान महादेव व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
भगवान महादेव हे अखंड भारताचे दैवत आहे परंतु भगवान महादेव आदिवासींसाठी आराध्य दैवत आहेत.आदिवासींचं त्यांच्याशी अतूट नातं आहे.आदिवासी त्यांना आपला मुळ पुरुष मानतात.भारतामध्ये सर्वांत पुरातन काळापासून महादेवाचेच शिवलिंग आढळतात मोहेंजोदडो, हडप्पा येथे उत्खननात देखिल आढळले आहेत.महादेवाला जसा भोळा मानले जाते तसे ते तांडव करणारे म्हणून समजले जातात त्यांचेच गुण हे आदिवासींमध्ये अवगत आहेत.त्यामुळे शिवरात्रीला महादेवाची आठवण म्हणून पुजन केले जाते व संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. त्यांनी बंजारा समाजात व्याप्त अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि भीती नष्ट करण्यासाठी मोठे कार्य केले. तसेच, त्यांनी समाजाला सेवाभावाची शिकवण दिली.संत सेवालाल महाराज यांनी समाजात प्रेम, एकता आणि करुणेचा संदेश रुजवला आणि बंजारा समाजाला एकात्मतेच्या सूत्रात बांधले.अशा भगवान महादेव व संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठेयांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार राजेंद्र बेंडकुळे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे राजेंद्र बेंडकुळे प्रभाकर गाडेकर शाम डांगे किरण माळी चंद्रकांत नंदन विलास कुलथे साहिल लोखंडे आदेश गोसावी आदेश वरंदळ आदि उपस्थित होते
.
