
कन्नड (बातमीतार) दिनांक 16 सप्टें.2025 शिवाजी महाविद्यालयात विज्ञानमंच चे उदघाटन प्रा. डॉ. सविता शेटे (सेक्रेटरी , विवेक वाहीनी महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विवेक वाहीनी विषयी विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले . तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंध्रश्रद्धा निमूर्लन कार्यावरही प्रकाश टाकला. विद्यार्थांना विवेक वाहीनी विषयी माहिती देतांना म्हणाले की. ‘विवेक वाहिनी’ म्हणजे विवेकबुद्धी किंवा विचारशक्तीचा एक प्रवाह होय. हि एक चळवळ असुन युवकांच्या स्व-विकासासाठी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, लैंगिक समानता, आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या सामाजिक कार्यांसाठी युवकांना एकत्र आणणारं आणि त्यांना प्रशिक्षित करणारे एक व्यासपीठ आहे. “विज्ञानमंच ” च्या उद्घघाटन प्रसंगी डॉ. सविता शेटे यांनी ‘विवेक वाहिनी’ च्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला तसेच जिवनामध्ये विवेक जागृत ठेवण्यासाठी ‘पंचसुत्री’ अवलंबली पाहिजे यामध्ये प्रामुख्याने दररोज ललित साहित्य व वृत्तपत्र वाचन केले पाहिजे , रोज व्यायाम केला पाहिजे , चांगली संगत मित्र असले पाहिजेत, आंतरबाह्य स्वच्छाता बाळगली पाहिजे , स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत, व वैज्ञानीक जाणीवा ठेवल्या पाहिजेत . पुढे सविस्तर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विवेक जागृत ठेवण्यासाठी विद्यार्थांनी शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करून अंधश्रद्धा कमी करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतः मध्ये रुजवणे गरजेचे आहे , तसेच सामाजिक, राष्ट्रीय मूल्ये ताण तणाव व्यवस्थापन व जीवन कौशल्या विषयी जागरूकता निर्माण करणे महत्वाचे असुन , लैंगिक समानता, पर्यावरण धोके, आणि विवेकी जोडीदाराची निवड यांसारख्या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सविता शेटे यांनी ‘विज्ञानमंच’ चे उद्घघाटन विद्यार्थांना एक आगळा वेगळा प्रयोग दाखवून केले या प्रयोगामध्ये विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभाग नोंदवला व प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध करून दाखवला व विद्यार्थांना म्हणाले की, अंधश्रध्देला बळी पडू नका , बुवाबाजी पासून सावध रहा असा मौलीक सल्ला दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजय भोसले होते . अध्यक्षीय समारोप करतांना विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे व जिवन मुल्य रुजविण्यासाठी कृतीशील , प्रयोगशील शिक्षण घेतले पाहिजे तसेच विज्ञानाची कास धरली पाहिजे असे प्रतिपादन केले . व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर , विजय घेवारे उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी.डब्लू शिंदे यांनी केले . सुत्रसंचालन कुमारी अनुष्का सौंदणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल क्षिरसागर यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शैलेंद्र कोल्हे, डॉ. पोपट आव्हाळे, डॉ. सलीम शेख , डॉ. सचिन उपाध्ये व विज्ञान मंच समिती यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..
