
नाशिक ( प्रतिनिधी ) आज दि १६ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज , नाशिक या शाळेत जागतिक ओझोन संरक्षण दिन साजरा करण्यात आला. ओझोन दिनानिमित्त शाळेत इयत्ता ५ वी ते ८वी च्या विदयार्थीनींसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थिनींनी ओझोन थराचे महत्व व त्याचे संरक्षण दर्शविणारे आकर्षक चित्रे काढली. विदयार्थिनींनी मोठया प्रमाणावर यात सहभाग घेतला. इयत्ता ९ वी व १० वी च्या विदयार्थीनींसाठी ओझोन थराचे संरक्षण काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुशारे मॅडम, उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी , पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे यांनी विद्यार्थिनींच्या चित्रांचे निरीक्षण करून कौतुक केले, स्पर्धाचे आयोजन विज्ञान छंद मंडळ प्रमुख चेतना टोपले , विज्ञान विषय प्रमुख प्रतिभा महाजन यांनी केले.कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

