
ओझर:दि.१६ (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ओझर येथील बोरस्ते विद्यालयात ओझोन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दहावीच्या २३ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे दादासाहेब सोनवणे भाऊसाहेब रौंदळ आत्माराम शिंदे हेमंत भट महेंद्र डांगले बाबासाहेब लभडे बाबासाहेब गायकवाड रेखा देशमाने रूपाली जाधव वनिता शिंदे स्वाती बोरसे उपस्थित होते. वैदेही जाधव मानसी बच्छाव श्रावणी जाधव साधना मंडलीक या विद्यार्थ्यांनीनी ओझोन वायू विषयी माहिती दिली.शिक्षिका वनिता अहिरे यांनी विद्यार्थ्यांना ओझोन दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी जाधव हिने केले. क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यांनी आभार मानले.
