
इगतपुरी ( प्रतिनिधी )इगतपुरी तालुक्यात स्वराज्य पक्षाला भगदाड पडले असुन विधानसभा उमेदवार डॉ शरद तळपाडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष आ रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दादर येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव भाजपा नेते भास्करराव गुंजाळ उत्तमराव भोसले इ उपस्थित होतेइगतपुरी तालुक्यात भारतीय जनता पार्टी मजबूत होत असताना हा पक्षप्रवेश म्हणजे येणाऱ्या काळात पक्ष ताकदीने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे दिसते डॉ तळपाडे यांच्यासह गोंदे सोसायटी मा चेअरमन विजय नाठे,मा. रामदास धोंगडे कुर्हेगाव, मा.कैलास नाठे गोंदेदुमाला, मा. हरीश कुंदे ( स्वराज्य पक्ष सहकार जिल्हाप्रमुख), मा. राजाराम गुळवे ( मा. सरपंच बेळगाव कुर्हे) , मा. दत्तूभाऊ नाठे ( शिवसेना शाखाप्रमुख), मा.धनंजय नाठे गोंदेदुमाला,मा. श्रीराम करंडे (जानोरी), भावराव धादवड शेनवड खुद स्वराज्य पक्ष शाखा प्रमुख गजिराम वारघडे शेनवड खुद स्वराज्य पक्ष उप शाखा प्रमुख दतु वारघडे स्वराज्य पक्ष गट प्रमुख बापू गुळवे राजाराम मुसळे ई कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला

या पक्ष प्रवेशास महिला जिल्हध्यक्षा सीमा झोले इगतपुरी पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे,जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर आय टी अमोल पवार किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन नाठे,जिल्हा पदाधिकारी अनिल चौधरी,चेअरमन योगेश सुरुडे, इ पदाधिकारी उपस्थित होतेमोदीजींच्या व देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जन पक्षप्रवेश करत आहेत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असणार आहे इगतपुरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीला पक्ष ताकदीने सामोरे जाणार आहे प्रतिक्रियाभास्करराव गुंजाळ भाजपा नेते
