
नांदगाव ( प्रतिनिधी, वार्ताकन -प्रज्ञानंद जाधव, नांदगाव )
नांदगाव येथील फुले नगर ग्रामपंचायत येथील शेतकरीकन्या अनिता अंबादास जगधने यांना नुकताच मुंबई येथील आस्था सामाजिक संस्थे मार्फत महाराष्ट्र समाजदूत 2025 हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन देण्यात आला होता त्या पाठोपाठ त्यांना पुन्हा 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त दुसऱ्यांदा सन्मान करून महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिल महाराष्ट्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-२०२५ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की नांदगाव शहरातील लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल येथील इंग्लिश विषयाच्या शिक्षिका अनिता अंबा दास जगधने यांनी आपल्या कारकीर्द मध्ये पंधरा वर्ष शैक्षणिक सेवेत मोठे योगदान देऊन आपल्या कार्याची चमकदार कामगिरी केली आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या आस्था सामाजिक संस्थे तर्फे त्यांना समाजदूत पुरस्कार मिळाला आहे त्या पाठोपाठ 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनानिमित्त नुकताच महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिल महाराष्ट्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-२०२५ झालेल्या नामांकन फॉर्म मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका 2025 हा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाला आहे.

शिक्षिका अनिता जगधने हे गरजवंत विद्यार्थी यांना शालीय साहित्याच देखील आपल्या परीने होईल तेवढी मदत करत असतात मुळात शेतकरी कन्या असुन परिस्थितीची जाणीव आहे आपलं शिक्षिकासह मातृत्व देखील काळजीने जपतात मुळात त्या सुशिक्षित शिक्षित घराण्यातील असल्याने सु संस्कृतीक संस्कारीक आहे त्यांचे वडील अंबादास महादू जगधने हे उपनिरीक्षक (CISF) सेवानिवृत्त अधिकारी होऊन गेले आहेत आई गृहिणी असुन दोन लहान भाऊ नामें चंद्रकांत अंबादास जगधने हे IDFC First Bank Ltd येथे कार्यरत असुन ट्रेड फॉरेक्स कौन्सिलर (वरिष्ठ व्यवस्थापक) नाशिक येथे आहे तसेच दुसरे बंधु श्रीकांत अंबादास जगधने हे पुणे येथे मिशेलिन कंपनी मध्ये (सॉफ्टवेअर इंजिनीअर)आहे आणि शिक्षिका अनिता जगधने यांनी सहायक शिक्षक म्हणून त्यांना १५ वर्षांचा अनुभव असुन(इंग्रजी, इतिहास) या विषयात विद्यार्थीच्या भविष्यासाठी चांगलीच भर दिली आहे तसेच दिल्लीची राज्यधानी मुंबई येथे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, कळंबोली तसेच श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, दौंड. सेंट सेबास्टियन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, दौंड,संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल, दौंड.आणि सध्या कार्यकाळ नांदगाव शहरातील लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल,नांदगाव.येथे आपल्या प्रामाणिक कामाची शैक्षणिक ज्ञानाची मशाल सदैव पेटती ठेवली आहे आशा हुशार, बुद्धीवन्त,रुबाबदार प्रामाणिक, मेहनती,होतकरू, शिक्षिकांचा सन्मान सत्कार करणे सामाजिक संस्था कायमच पुढे येतं असतात आणि हुरूप वाढवत असतात शाळेतील सहकारी कर्मचारी वर्गासह शाळेचे नाव,आपल्या आई वडिलांचे नाव घरातील प्रत्येकांचा त्यांच्यामुळे गर्वाने माना उचवल्या आहेत आणि या सर्वांसह आई वडिलांच्या संस्कारानेच मी हे पुरस्कार प्राप्त करू शकले आहेत असे त्यांनी सांगितले तसेच अनेक स्थरातून त्यांचा पुन्हा एकदा सन्मान शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन होतं असुन त्यांच्या ह्या यशस्वी वाटचालीस विद्यार्थीनी गुलाब देऊन त्यांचे चरणस्पर्श केले करून त्यांचा सन्मान केला आहे. शिक्षिका अनिता जगधने या आनंदमय वातावरणात मनोमणी भारावून गेल्याने लेकरांच्या आठवणीत भावनिक होऊन त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसुन येतं होते एका पाठोपाठ त्यांना दोन पुरस्कार मिळाल्याने अनेक ठिकाणा वरून व विविध स्थरातून त्यांच्यावर शुभेच्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.
