
लेखक:-रविराज सोनार* (शब्दगंध प्रतिष्ठान)
…*ना. धों. या शब्दातच जादू आहे, उच्चारलेल्या बरोबर डोळ्यांपुढे उभे राहतं ते हिरवीगार शेत-मळा. अस्सल गावरान शेती मातीची कविता, शब्दकळा.. म्हणजे महानोर. शाळेतून महानोरांचा परिचय कवितांमधून झालाच होता. पण दृढ परिचय आणि संबंध आले ते मालेगावचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप (दादा) भामरेंमुळे. दिलीपदादांशी त्यांचे अकृत्रिम नैसर्गिक मैत्र होते. महानोर दादांची एक अनौपचारिक मैफलच दिलीपदादांच्या घरी आमची असायची. महानोर दादांच्या ‘ह्या नभाने ह्या भूमीला दान द्यावे’ या कवितेने इतका ‘लळा’ लावला की, आम्ही याच कवितेतील ‘शब्दगंधे, तू मला बाहूत घ्यावे.’ या ओळीतून नंतर आम्ही मित्रांनी ‘शब्दगंध प्रतिष्ठान’ ही साहित्य चळवळ सुरू केली. आज महानोर दादांचा जन्मदिन…महानोर दादांचा शेतीशी, रानाशी एक गहिरा संबध होता… एक नाते होते… त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर —“ह्या शेताने लळा लाविला असा कीसुख दुःखाला परस्परांशी हसलो-रडलोआता तर हा जीवच अवघा असा जखडलामी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो…”त्यांचे शेत-रानावर अतोनात प्रेम होते आणि रानाचेही त्यांच्यावर प्रेम होते… ते रानाशीच त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी बोलतात… रानही त्यांच्याशी बोलत असावे कारण त्यांना रानाच्या संवेदना जाणवल्याचे दिसते….महानोर दादांनी निसर्गाला एक शक्ती न मानता, त्याला देह दिला आहे; त्याचे अनुभव व संवेदना यांचे दर्शन त्यांना देहाच्या माध्यमातून घडले आहे. हा निसर्ग देहधारी असल्यामुळे तो प्रतिमित होणे हेही अधिक सुकर झाले आहे. महानोर दादांनी त्याचे केवळ चेतनीकरण न करता, त्याला एक स्वयंपूर्ण अस्तित्वच दिले आहे….त्यांचे रानाशी झालेले सायुज्य शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. तोच महानोर दादांचा संपूर्ण अनुभव आहे. त्यांना या अनुभवापुढे इतर सगळे दुय्यम वाटते. रान हे त्यांचे ध्यान, त्यांचा साक्षात्कार. एकदा हा साक्षात्कार झाला की ‘नभ आणि भुई’ यांच्यातील भावबंध जाणवू लागतो. डोळे भरून येतात. जीव तेथेच गुंतून राहतो.ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावेआणि ह्या मातीतुनी चैतन्य गावेकोणती पुण्ये अशी येती फळालाजोंधळ्याला चांदणे लखडून जावेह्या नभाने ह्या भुईला दान द्यावेआणि माझ्या पापणीला पूर यावेपाहता ऋतुगंध कांती सांडलेलीपाखरांशी खेळ मी मांडून गावेगुंतलेले प्राण ह्या रानात माझेफाटकी ही झोपडी काळीज माझेमी असा आनंदुनी बेहोश होताशब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!
—————————-*मी रात टाकली, मी कात टाकली*
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली….हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालतीहिरव्या पानांत,
हिरव्या पानांतचावंळ चावंळ
चालतीभर ज्वानीतली
नारभर ज्वानीतली नारअंग मोडीत चालतीहिरव्या पानांत,
हिरव्या पानांतपानांत गं… पानांत गंमी रात टाकली,
मी कात टाकलीह्या पंखावरती,
मी नभ पांघरतीह्या पंखावरती,
मी नभ पांघरतीमी मुक्त मोरनी बाई,
चांदन्यात न्हातीहिरव्या पानांत,
हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालतीभर
ज्वानीतली नारअंग मोडीत चालती
हिरव्या पानांत, हिरव्या पानांतचावंळ चावंळ चालती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली
मी रात टाकली, मी कात टाकली
मी रात टाकली…मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
मी रात टाकली, मी कात टाकली.
——————–याही कवितेतील/ गीतातील ‘मालन’ आणि ‘बाजिंदी’ या शब्दांनी गारुड केलयं की, हे शब्द जणूकाही फक्त स्मीता पाटील साठीच आले असावेत, असं वाटतं. मालन हा शब्द विशेषतः आमच्या खान्देशात वापरला जातो. (स्मिता पाटील खान्देशी, महानोर दादांचं पळसखेड हे मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवरचं गाव.) ‘बाजिंदी’ म्हणजे जिद्दी य अर्थाने स्मिताचच जणू वर्णन यातून महानोर दादांनी केलयं.
————————जन्म- १६ सप्टेंबर १९४२ (पळसखेड जि. औरंगाबाद) मृत्यू- ३ ऑगस्ट २०२३*
प्रकाशित साहित्य**
अजिंठा (दीर्घ कविता)
* कापूस खोडवा (शेतीविषयक)
* गंगा वाहू दे निर्मळ (कविता)
* गपसप (कथासंग्रह)
* गावातल्या गोष्टी (कथासंग्रह)*
जगाला प्रेम अर्पावे (कविता)*
त्या आठवणींचा झोका*
दिवेलागणीची वेळ (कविता)*
पळसखेडची गाणी (लोकगीते)*
वही*
पक्षांचे लक्ष थवे*
पानझड *
पावसाळी कविता (कविता)
* *गांधारी (कादंबरी)*
आनंदयात्री पु. ल. देशपांडे*
ऐशी कळ्यांची जाती*
यशवंतराव चव्हाण आणि मी (व्यक्तिचित्रणपर)*
या शेताने लळा लाविला*
रानातल्या कविता (कविता)*
शरद पवार आणि मी*
शेती, आत्मनाश व संजीवन (शेतीविषयक)*
*चित्रपटगीते** * जैत रे जैत* दोघी* एक होता विदुषक* मुक्ता* सर्जा* मालक* ऊरुस* –
*रविराज सोनार* (शब्दगंध प्रतिष्ठान)
