.

*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३० वा दिवस* जगाला जेवढे म्हणून ज्ञान आजतागायत उपलब्ध झाले आहे, ते सारेचे सारे मनातूनच आविर्भूत झालेले आहे. विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे. बाह्य जगत् हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण एक उपयुक्त संधी वा निमित्त होय. सफरचंद पडले, न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरले. स्वतःच्या मनामधे आधीपासूनच विद्यमान असलेल्या विचारशृंखलांची त्याने फिरून नव्याने जुळवाजुळव केली, आणि या सर्व प्रकारात त्याला त्यामधे आणखी एक नवीनच साखळी सापडली त्यालाच आपण ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ म्हणू लागलो.
*स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १६ सप्टेंबर २०२५
★दशमी श्राद्ध ★ १९१६ विख्यात शास्त्रीय गायिका एस. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्मदिन
.★ १९४२ निसर्ग कवी व प्रगतशील शेतकरी नामदेव धोंडो तथा ना. धो. महानोर यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
