
नांदगाव (वार्ताहार ) “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ते चांगले माणूस आणि उत्तम चरित्र घडवणारे असावे “- स्वामी विवेकानंद दि.१५ सप्टेंबर २०२५ गुरुवार रोजी व्ही.जे. हायस्कूल नांदगाव शाळेत स्वामी विवेकानंद यांचे शिकागो धर्म परिषदेतील एकता आणि बंधुतेचा संदेश देणारे व जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक भाषण पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व८ वी ते १० वी अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष मा.श्री.संजीव धामणे ‘ मुख्याध्यापक मा.श्री.लक्ष्मीकांत ठाकरे परीक्षक मा.श्री रंगनाथ चव्हाण गुरुजी,मा श्री.दत्तराज छाजेड, प्रा.श्री.अमोलजी अहिरे , सौ.प्रतिभा खैरनार शिक्षक प्रतिनिधी श्री.प्रवीण अहिरे स्पर्धाप्रमुख सौ.रुपाली झोडगेकर,श्री.कुणाल जोशी ,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सौ पूनमताई लोहाडे ,सदस्य श्री.अनिल थोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आपल्या प्रास्ताविकातून शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.लक्ष्मीकांत ठाकरे यांनी सांगितले की आजचा हा कार्यक्रम काही जयंती किंवा पुण्यतिथीचा नाही तर आजचा हा कार्यक्रम स्वामीजींना मानवंदना देण्यासाठी आहे ! व आपण आपल्या संस्कृतीचा आदर राखला पाहिजे असे सांगितले,प्रमुख पाहुण्यांचा परिचय.श्री प्रवीण अहिरे यांनी करून दिला प्रमुख पाहुणे मा.श्री.संजीव धामणे यांनी स्वामीजींनी दिलेली शिकवण अंगीकारली पाहिजे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली झोडगेकर यांनी केले, दोन्ही गटातून प्रथम द्वितीय व तृतीय व उत्तेजनार्थ दोन असे तीन गटातून मिळून पंधरा बक्षीसे काढण्यात आली.स्पर्धेत दोन्ही गटातून एकूण ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .आपल्या ओघवत्या हृदयस्पर्शी भाषणातून विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार व त्यांना मिळालेली दाद , भाषाशैली व भारताची संस्कृती चे दर्शन कसे घडविले या विषयी विद्यार्थीनींनी सर्व उपस्थिताची मने जिंकली

.स्पर्धेत इ. ५वी ते ७वी गटात ( सकाळसत्र)प्रथम- कु.प्रांजली भाबड द्वितीय- कु.वेदश्री पाटील तृतीय- कु.भूमी बनबेरूउत्तेजनार्थ कु.आनंदी बच्छाव कु.यामिनी चव्हाण इ.८ वी ते १०वी गटात( सकाळसत्र )प्रथम क्र .- कु.साक्षी काळे द्वितीय क्र.कु.श्रावणी बोरसे तृतीय क्र- कु.वेदश्री कदम उत्तेजनार्थ – कु.निशांतचव्हाण कु.मृण्मयी दंडगव्हाळ इ.८ वी ते १०वी गटात( दुपारसत्र )प्रथम क्र-कु.सिद्धांत धायवटे द्वितीय क्र . कु.सोहम कुलथे तृतीय क्र- कु.विराज सरोदे उत्तेजनार्थ कु.सोहम गायकवाड , कु.ओम बाळासाहेब यांनी बक्षिसे मिळवली समारोपाच्या भाषणात श्री. दत्तराज छाजेड यांनी स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारताची वेगळी ओळख करून दिली असे सांगितले तर परीक्षक श्री अमोल अहिरे यांनी सांगितले की स्वामी विवेकानंद ही व्यक्ती नसून ती वृत्ती आहे व ती आपण जोपासली पाहिजे .स्पर्धा यशस्वी होण्याकरिता स्पर्धाप्रमुख सौ.रुपाली झोडगेकर ,श्री कुणाल जोशी, श्री प्रवीण अहिरे शाळेतील इतर सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले..
