
नासिक रोड- ब्राह्मण सभा नाशिक रोड संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१५/९/२५ रोजी, ब्राह्मण सभागृह, दसक, जेल रोड, नासिक रोड येथे उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी मागील वर्षी दुःखद निधन पावलेल्या पदाधिकारी, सभासद नातलग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन दत्ता कुलकर्णी सचिव यांनी केले. त्रुटी नसल्यामुळे त्याला मंजुरी देण्यात आली.१/४/२४ ते ३१/३/२५ या कालावधीचा वार्षिक अहवाल अनघा कुलकर्णी यांनी वाचून दाखवला व त्यास देखील मंजुरी देण्यात आली. १/४/२४ ते ३१/३/२५ या कालावधीचा वार्षिक जमा खर्च, ऑडिट रिपोर्ट, अंदाजपत्रक याचे वाचन राजीव व्यवहारे कोषाध्यक्ष यांनी केले.

उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व जमा खर्च, अंदाजपत्रक, ऑडिट रिपोर्ट मंजूर करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात कमलाकर कुलकर्णी, उदय धर्माधिकारी, उदय शेवतेकर, जयंत देशपांडे, निलेश मुळे, सुनील मेंढेकरदिलीप भिंगारकर आदींनी भाग घेतला. मुकुंद कुलकर्णी अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना वधू-वर मेळावा, सामुदायिक मुंज, बेरोजगार मेळावा, महिलांचे हळदीकुंकू उत्सव, गणपती उत्सव, विविध स्पर्धा, वर्धापन दिन इत्यादी कार्यक्रमासाठी सर्वच कार्यकारणी पदाधिकारी काम करतात याबद्दल समाधान व्यक्त केले. ब्राह्मण सभागृह विस्तारित बांधकाम शुभारंभ लवकरच करण्यात येऊन दानशूर व्यक्तींनी बांधकामास सहाय्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कुलकर्णी सचिव व आभार प्रदर्शन सुनील मेंढेकर यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता पसायदानाने झाली. समारोप अल्पोपहार व चहापानाने झाला. वार्षिक सर्वसाधारण सभेत सुरेश कुलकर्णी, सारंग धरणगावकर, किरण हिंगणे, अनघा जोशी, मंदाकिनी शेरीकर, भारती देशपांडे, मेखला रास्वलकर, दिपाली भिंगारकर, निशा कपोले, मकरंद एकतारे, श्रीपाद देशपांडे, मिलिंद ताथोडे, संकेत मेंढेकर, शुभदा देशपांडे, जयंत पारळकर, प्रभा पारगावकर आदी उपस्थित होते.
( वृत्तपत्र संपर्क-दत्ता कुलकर्णी ९९२२४४४२२१)
