
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) माजी आमदार ॲड अनिलदादा आहेर यांचे वडील स्व. गंगाधर (आण्णासाहेब) शिवराम आहेर यांची पुण्यतिथी ” चैतन्य दिन” म्हणून साजरी करण्यात आली.या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या नावाने असलेली न्यायडोंगरी येथील श्री. शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्व. गंगाधर (अण्णासो) शिवराम आहेर आदिवाशी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत ” गोवर व रूबेला ” या रोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

प्रथम स्व. अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर यांच्या समाधी स्थळी ( हायस्कूल परिसरात) सर्व प्रतिष्ठित नागरिकांचे उपस्थितीत दीपप्रज्वलन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .लसीकरण मोहिमेचे प्रमुख म्हणून नांदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप, न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम आहेर, आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे डॉ. दत्तात्रय मोरे . तसेच न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .या वेळी सुमारे “च्यारशे” विद्यार्थ्यांना लसीकरण करून आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले संस्थेचे सरचिटणीस ॲड.अनिल दादा आहेर, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

