
विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन डेर्ले सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला डंबळे श्रीम सरला कदम, हिंदी विषयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती आहेर पी.आर सर्व शिक्षक वृंद
पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी) :– पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय येथे राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री. संजय डेर्ले सर यांच्या हस्ते थोर उर्दू साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे हिंदी दिनानिमित्ताने हिंदी भाषेचे विदयार्थी निर्मित माहितीपर साहित्य या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमार कृष्णा सोनी व प्रणव मोरे तशेच पायल गोसावी यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले. विद्यालयाच्या गीत मंचाने हिंदी राष्ट्रीय भाषेचे महत्व समूह गीतातून सादर केलं. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषेचं महत्त्व नाटकाच्या माध्यमातून सादर केलं.विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती पुष्पा आहेर व श्रीम सुवर्णा घुमरे यांनी हिंदी भाषा का महत्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. जागतिक हिंदी दिवस यानिमित्ताने विद्यालयामध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व गटानुसार प्रथम तीन विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. एस.एन डेर्ले सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना हिंदी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कस्तुरी गागरेपाटील व ईश्वरी आहेर यांनी केले. हिंदी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभाच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
